• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 11, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई

जळगाव, ( प्रतिनिधी ) :- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही विशेष मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली १० ऑक्टोबर २०२६ रोजी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत अवैध धंदे, दारू विक्री, जुगार, अमली पदार्थ आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध व्यापक कारवाई करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे आणि संबंधित शाखांच्या पथकांनी एकाच वेळी विशेष तपासणी, नाकाबंदी, गस्त तसेच कायदेशीर कारवाई केली. अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासोबतच गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, फरार आरोपींचा शोध आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आला.

मोहिमेतील कारवाईचा तपशील

जळगाव जिल्हा पोलीस दलाने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटनुसार, मोहिमेदरम्यान पुढीलप्रमाणे कारवाई करण्यात आली.

  • अवैध गावठी हातभट्टी दारूविरोधात कारवाई : ११८ गुन्हे दाखल करून ११८ आरोपींवर कारवाई करण्यात आली. सुमारे ५,३७७ लिटर गावठी दारू, रसायने, वॉश व साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख ७ हजार १४० रुपये असल्याचे नमूद आहे.
  • देशी व विदेशी दारूविक्रीविरोधात कारवाई : ४८ गुन्हे दाखल करून ४८ आरोपींवर कारवाई करण्यात आली.
  • जुगार कायद्यान्वये कारवाई : ७२ गुन्हे दाखल करून ८५ आरोपींवर कारवाई करण्यात आली. रोख रक्कम व जुगार साहित्य मिळून ५२ हजार २५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
  • शस्त्र अधिनियमांतर्गत कारवाई : गावठी कट्टा आणि तलवार जप्त करण्यात आली.
  • वाहतूक नियमांचे उल्लंघन : मोटार वाहन कायद्यान्वये २,२१८ केसेस करण्यात आल्या. त्यातून २० लाख ४४ हजार ४७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
  • पोलीस स्टेशन स्तरावरील वाहतूक कारवाई : ७७८ केसेस करून ५ लाख ८९ हजार ५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
  • हरविलेल्या महिला व पुरुषांचा शोध : ६२ महिला, ४६ पुरुष, ३० मुली आणि २ मुलांचा शोध घेण्यात आला.
  • भंगार दुकानांची तपासणी : १०१ दुकाने तपासण्यात आली. मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम १२४ अन्वये १४ कारवाया करण्यात आल्या.
  • पानटपऱ्यांवरील कारवाई : कोटपा कायद्यान्वये १०८ केसेस करण्यात आल्या. तसेच १०० मीटर परिसरातील ११ पानटपऱ्यांमधील नियमबाह्य बाबींवर कारवाई करण्यात आली.
  • इलेक्ट्रिक मोटार व वायर चोरीची प्रकरणे : २ गुन्हे उघडकीस आणण्यात आले. या कारवाईत २ मोटार पंप व १ मोटारसायकल असा एकूण २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
  • अवैध वाळू वाहतूक : २ गुन्हे दाखल करून २ आरोपींवर कारवाई करण्यात आली. ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
  • अंमली पदार्थांविरोधात कारवाई : १६ गुन्हे दाखल करून १६ आरोपींवर कारवाई करण्यात आली.
  • पाहिजे असलेले आरोपी पकडले : एकूण १० आरोपींना पकडण्यात आले.
  • महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई : हद्दपार आरोपींविरुद्ध ६ कारवाया करण्यात आल्या.
  • मद्यपान करून सार्वजनिक शांतता भंग : ३५ केसेस करण्यात आल्या.
  • मद्यपान करून वाहन चालविणे (ड्रंक अँड ड्राइव्ह) : ३६ केसेस करण्यात आल्या.
  • समन्स व वॉरंट बजावणी : ४६८ समन्स व वॉरंट बजावण्यात आले.
  • हॉटेल व ढाब्यांची तपासणी : ६७ ठिकाणांची तपासणी करण्यात आली.
  • सायबर रिटर्न्स संदर्भातील कारवाई : २१ कारवाया करण्यात आल्या.
  • EOW Amount Block : ५ कारवाया करण्यात आल्या.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचे आवाहन

नवरात्रोत्सव शांततेत, सुरक्षित आणि निर्भय वातावरणात साजरा करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, अफवा पसरवू नयेत आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी राबवली.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

चोपड्यात अवैध गौण खनिज वाहतूक उघड; ७ लाखांचा ट्रक आणि ६ हजारांची वाळू जप्त

Next Post

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!
खान्देश

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 11, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई
क्राईम

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई

October 11, 2026
चोपड्यात अवैध गौण खनिज वाहतूक उघड; ७ लाखांचा ट्रक आणि ६ हजारांची वाळू जप्त
क्राईम

चोपड्यात अवैध गौण खनिज वाहतूक उघड; ७ लाखांचा ट्रक आणि ६ हजारांची वाळू जप्त

October 11, 2026
जामनेर तालुक्यात शेतातील कापूस चोरीला; १० ते १२ हजारांचे नुकसान
क्राईम

जामनेर तालुक्यात शेतातील कापूस चोरीला; १० ते १२ हजारांचे नुकसान

October 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 11, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई

October 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!