धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे भेट
धरणगाव (प्रतिनिधी) :- शाळांमधील भौतिक सुविधांची परिस्थिती पाहण्यासाठी उच्च न्यायालयाच्या पथकाने पाळधी गावातील जिल्हा परिषद शाळेत भेट देत तपासणी केली. तपासणीत त्यांनी विविध बाबींची माहिती घेऊन शिक्षकांना सूचना केल्या.
समितीत जळगाव जिल्हा न्यायाधीश एस. एन. राजुरकर, तहसीलदार नानासाहेब आगळे, पहूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन सानप, गटशिक्षणाधिकारी राम लोहार, केंद्रप्रमुख बाबुराव धुंदाले उपस्थित होते. यावेळी शाळेतील सर्व परिसरात या समितीने भेट देत प्रत्यक्ष पाहणी करून मुलांसोबत चर्चा केली. यावेळी शाळेत मिळणाऱ्या शालेय पोषण आहार, पिण्याचे पाणी, शैक्षणिक ज्ञानविषयी समितीने मुलांना प्रश्न विचारले.
गावातील मुलांच्या व मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य प्रा. ईश्वर चोरडिया, सागर बावस्कर, पोलिस पाटील प्रविण पाटील हे उपस्थित होते. यावेळी समितीसमोर शाळेतील समस्या विषयी प्रा.ईश्वर चोरडिया यांनी काही प्रश्न या समितीसमोर मांडले. समितीने शाळेतील समस्याविषयी लवकर वरती कळवून योग्य निर्णय घेऊन निरसन करण्यात येईल असे सांगितले.