जळगाव ( प्रतिनिधी )- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
जिल्हा बँक निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरतांना जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन आमदार किशोर पाटील यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ , ठराव संमत झालेले विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सदस्य आणि शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या निवडणुकीत पाचोरा तालुक्यात शिवसेनेला राष्ट्रवादी साथ देणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.