कोळी महासंघातर्फे मंत्री गिरीश महाजन यांचे आभार
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) – जिल्हयातील कोळी समाजाच्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या कोळी समाजाच्या काही नागरिकांना जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेवर देत नसल्याने जिल्हाभरातील काही लोकांना अपात्र ठरविण्यात आले होते. परंतु ही अडचण लक्षात घेऊन मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्याशी चर्चा करून शासनाद्वारे या लोकांना एक वर्षाची मुदत वाढवून दिल्याने मंत्री गिरीश महाजन यांचे कोळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष हरलाल कोळी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने आभार मानले आहे.
त्यात प्रामुख्याने महासंघाचे जिल्हाध्यक्ष हरलाल कोळी, चंद्रकांत कोळी, रवी कोळी, सोपान कोळी, जामनेरचे टायगर कोळी, संतोष कोळी, विनोद कोळी, यावलचे सागर कोळी, नितिन सपकाळे, सुजित कोळी, बंडू कोळी, सोपान कोळी, विनायक कोळी, शरद कोळी, सदाशिव कोळी, सुधिर तायडे इत्यादींचा समावेश होता.