जळगाव;- जर्मन देशातील बाडेन-युटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करण्यात आलेला असून, ज्यामध्ये वाहनचालकांचा समावेश असून, सदर कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी क्र.०१ च्या शासन निर्णयानुसार कार्यपध्दती निश्चित करण्यात आलेली आहे.
१. सदर प्रकल्पाअंतर्गत जर्मनीस जाण्यासाठी, इच्छुक वाहनचालकांनी शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या QR Code वर स्कॅन करुन त्यावर दिलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबत अर्ज भरावा.
२. दिलेल्या QR Code स्कॅन अर्जदाराने कशाप्रकारे अर्ज करावा याबाबतची प्रक्रिया सादरीकरणात उपलब्ध करुन देण्यात आलेलीआहे.
३. बाडेन-वुटेनबर्ग या राज्यास कुशल वाहन चालक पुरविण्याच्या प्रकल्पाबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे एक हेल्प डेस्क कक्षाची उभारणी करण्यात आलेली आहे. तसेच बाडेन-बुटेनबर्ग या राज्यास कुशल वाहन चालक पुरविण्याच्या प्रकल्पाबाबत कार्यालयाच्या प्रथमदर्शनी भागास माहिती पत्रक लावण्यात आलेले आहे.
जर्मन देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्र राज्यातील कुशल वाहनचालक होण्याची संधीचा सर्व वाहनचालक यांनी लाभ घ्यावा, असे मोटार वाहन निरीक्षक तथा प्रभारी सहा. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश दुसाने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.