• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जनावरांच्या लम्पी आजाराची संसर्गकेंद्रे जिल्हाधिकाऱ्यांकडून घोषित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 2, 2021
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव तालुक्यातील मौजे वाकडी, पाचोरा तालुक्यातील नांद्रा, पिंपरखेड, वरखेड, भडगाव तालुक्यातील पिर्चेडे या ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी या त्वचेच्या साथ रोगाचा निष्कर्ष होकारार्थी आला आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चाळीसगाव, पाचोरा, भडगाव तालुक्यातील या चार संसर्गकेंद्रापासून 10 कि.मी बाधित क्षेत्र म्हणून घोषित केल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

लम्पी या त्वचेच्या आजाराच्या संसर्गाच्या अनुषंगाने बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जतुकीकरण करुन 10 कि.मी परिघातील परिसरात जनावरांची खरेदी-विक्री, वाहतुक, बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यासही प्रतिबंध घालण्यात आले आहे.

प्रादुर्भाव असलेल्या भागातील जनावरांचा बाजार, यात्रा, पशु प्रदर्शन इ. वर बंदी आणण्याच्या दृष्टीने या ठिकाणाच्या 10 कि. मी परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण तात्काळ करण्याचे निर्देश जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त पशुसंर्वधन, जिल्हा पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालय व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांना दिले असून त्यांनी या परिसरातील सर्व जनावरांचे 100 टक्के लसीकरण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या आहेत.

या भागातील जनावरांचे लसीकरण करण्यासाठी सद्यस्थितीत 15 हजार लस सेवाशुल्कातून खरेदी करण्यात आली असून चाळीसगांव, पाचोरा व भडगाव तालुक्यात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इतर भागातील जनावरांमध्ये या साथरोगाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता अजून 10 हजार लस पशुसंवर्धन विभागाकडून सोमवारी प्राप्त होणार असून जिल्ह्यातील पशुधनांची संख्या लक्षात घेता विभागाकडे अतिरिक्त 50 हजार लसीची मागणी करण्यात आली आहे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बाधीत जनावरांची संख्या, त्यांना लागणारी लसीची मात्रा याबाबत तातडीने तपासणी करुन वस्तुनिष्ठ अहवाल सोमवारपर्यत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राऊत यांनी संबंधित यंत्रणेला दिले जिल्ह्यात आवश्यकतेनुसार लसीची मात्रा उपलब्ध करुन देता येईल. तसेच सेवाशुल्कातून जिल्हास्तरावर लस खरेदी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील जनावरांमध्ये आढळून आलेल्या लम्पी या साथरोग आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनावरांना तातडीने लसीची मात्रा देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीकडून 10 हजार रुपये ग्रामनिधीतून उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी यंत्रणेला दिले आहेत.

सर्व तालुक्यात गट विकास अधिकाऱ्यांच्या स्तरावर ग्रामसेवक व पशुसंवर्धन संस्थाप्रमुखांची बैठक घेवून हा निधी तात्काळ उपलब्ध करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. यातून लस खरेदी व औषध खरेदी करण्यात येइल. ग्रामपातळीवर लसीकरण व गोठा स्वच्छता, गोचीड निर्मूलन मोहिम स्वरुपात राबविण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही डॉ आशिया यांनी कळविले आहे. पशुधन मालकांनी आपल्या जनावरांवर बारकाईन लक्ष ठेवावे जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज सदृष्य लक्षणे आढळून आल्यास पशुसंवर्धन विभागाकडून त्वरीत तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.


 

 

Previous Post

श्रमदानाने महात्मा गांधी जयंती साजरी

Next Post

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर नेमणूकीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर नेमणूकीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू
1xbet russia

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक
1xbet russia

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon