जामनेर ( प्रतिनिधी ) – जामनेर शहरातील शिवाजीनगरात राहणाऱ्या सुशील कुमार राजमल संकलेचा यांच्या भाड्याच्या घरामध्ये शनिवार १५ जुलै रोजी मध्यरात्री चोरट्यांनी बंद घर असल्याचा पाहून चोरी केली. चोरी करतांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
जामनेर शहरातील शिवाजी नगरात सुशिल कुमार हे राहायला आहे. शनिवारी त्यांचे घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी संधी साधली. बंद घर फोडून घरातून साडे तीन लाख रूपये किंमतीचा मुद्देमाला चोरी करण्यात आली. शिवाय सोन्याचे दागिनेही चोरले आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेतील चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. जामनेर शहरात गेल्या २ दिवसांपूर्वी अशाच प्रकारे तीन ठिकाणी चोरी झाली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी अशी धाडसी चोरी झाल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.