जामनेर (प्रतिनिधी) :- भारतातील मुस्लिम समाजातील पहिल्या शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा जामनेर यांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पूजन करून अभिवादन करण्यात आले.
वारसा स्री शक्तीचा, वसा साऊ-जिजाऊचा, ध्यास समता सन्मानाचा अंतर्गत सदर अभिवादनाचा कार्यक्रम जामनेर येथील गुरुकुल हॉल येथे संपन्न झाला. प्रसंगी से.नि. मुख्याध्यापिका प्रतिभा नसिकेत नरवाडे दाभाडे यांनी फातिमा शेख यांच्या जीवनपटाला उजाळा दिला. या कार्यक्रमात डॉ. मोहिनी मोरे यांची वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष नाना लामखेडे यांनी केले.
सूत्रसंचालन शाखा कार्याध्यक्ष बी. आर. पाटील यांनी तर जळगाव जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे यांनी आभार मानले. व्यासपीठावर शाखा उपाध्यक्ष रमेश गायकवाड, प्रधान सचिव भीमराव दाभाडे, म. फुले चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव जितेंद्र गोरे आदी. मान्यवर होते. तसेच कार्यक्रमास शोभा बोऱ्हाडे, काशिनाथ गायकवाड, सय्यद रशिद, भुसावळ येथील सुधाकर चौधरी, मालती चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.