जामनेर ( प्रतिनिधी ) – विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक आज होत आहे. 2022 ते 2027 या पाच वर्षांसाठी निवडणूकीत विद्यमान संचालक मंडळाचे सहकार पॅनल आमदार गिरीश महाजन व माजी खासदार ईश्वरबाबू जैन यांच्या नेतृत्वात आहे .सहकार पॅनेल समोर शेतकरी पॅनल आहे. 13 पैकी सहकार पॅनलच्या 2 जागा बिनविरोध झाल्या आहे .आता 11 जागांसाठी निवडणुक होत आहे सहकार पॅनलने सर्व जागांवर उमेदवार दिले आहे .शेतकरी पॅनल 10 जागेवर उमेदवार मिळाले सर्वसाधारण गटात शेतकरी पॅनलला उमेदवार मिळाला नाही सहकार पॅनलमध्ये भाजप , प्रहार , काँग्रेस, तर शेतकरी पॅनलमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद मराठी शाळा वाकी रोड या ठिकाणी मतदान होत आहे