जामनेर तालुक्यात सर्व ग्रामस्थांची केली जाणार तपासणी
जळगाव (प्रतिनिधी) : राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आता तालुकाभरातील दातांच्या आणी डोळ्यांच्या समस्येने ग्रस्त असलेल्या पिडीत नागरीकांची गावातच तपासणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व सुविधांनी सुसज्ज असलेल्या अद्ययावत रुग्णवाहीकेच्या माध्यमातून आरोग्य सेवा करण्यात येणार आहे.
योजनेची सुरुवात तालुक्यातील शेंदुर्णी येथे मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा साधना महाजन, गोविंद अग्रवाल, चंद्रकांत बाविस्कर, जितेंद्र पाटील, जेष्ठ नेते संजय गरुड, अमृत खलसे, रवींद्र झाल्टे, आतिष झाल्टे, सुहास पाटील, कैलास पालवे आदी उपस्थित होते.
फिरते नेत्ररोग तपासणी केंद्र यात डोळ्याचे नंबर काढणे, मोतीबिंदू, काचबिंदु, नासुर तपासणी व उपचार होतील. या करीता लागणारी सर्व अद्ययावत मशिन व यंत्र सामुग्री वाहनात आहे. तर दंतरोग व मुख रोग तपासणी व उपचार केंद्र यात दात काढणे, कवळी लावणे, कॅन्सर तपासणी, रूट कॅनल इत्यादींवर तपासणी व उपचारासाठी लागणारी सर्व यंत्र सामुग्री आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, रूबीस्टार हाॅस्पीटलचे तज्ञ डाॅक्टर, परिचारिका उपलब्ध आहेत.
आठवडय़ात दोन दिवस जामनेर तालुक्यातील खेड्यापाड्यात जाणार हे वाहन जाणार आहे.
पुढील उपचार, शस्त्रक्रिया या शासकीय योजनेत रूबीस्टार हाॅस्पीटल जामनेरला होतील, अशी माहिती ही भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.