खोटे इंजेक्शन देण्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी
जळगाव (प्रतिनिधी) — जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप करत २८ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटे इंजेक्शन देण्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत संबंधित तरुणीवर दबाव आणल्याचा तसेच लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित तरुणी ही शिरसोली नाका परिसरातील असून, २४ एप्रिल २०२५ पासून ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आरोपीने तिच्याशी संबंध ठेवले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, आरोपी ताबिश रजा सय्यद अली अंजुम (वय २८, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) याने पीडितेला खोटे इंजेक्शन देण्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तिच्यावर दबाव आणून संबंध ठेवले आणि संबंधित तरुणीने त्याच्याशी संबंध ठेवण्यास नकार दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या पीडितेने अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ८१८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ६४ व ३५२ प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील, एमआयडीसी पोलीस ठाणे, जळगाव करीत आहेत.