पहिल्याच दिवशी ५० हून अधिक बुकिंग्ज
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव-भुसावळ महामार्गावरील सरस्वती ग्रुपच्या सरस्वती एमजी मोटर्स शोरूममध्ये एमजी विंडसर ईव्ही प्रो या अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक चारचाकी वाहनाचा शुभारंभ दि. १३ मे रोजी पार पडला. याप्रसंगी सरस्वती ग्रुपचे संचालक मुकेश टेकवानी, धवल टेकवानी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, वाहनप्रेमी ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शुभारंभाच्या समारंभात बोलताना संचालक धवल टेकवानी यांनी भारतीय ऑटोमोबाईल बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी अधोरेखित केली. ते म्हणाले की, ग्राहक आता आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि पर्यावरणपूरक पर्याय निवडत आहेत. एमजी विंडसर ईव्ही प्रो हे मॉडेल ग्राहकांच्या या सर्व अपेक्षा पूर्ण करणारे आहे. हे अपग्रेड केलेले व्हर्जन असून यामध्ये ५२.९ किलोहवर्स क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे एका चार्जमध्ये सुमारे ४४९ किलोमीटर पर्यंत अंतर पार करता येते. विशेष म्हणजे, ग्राहकांना वाहनाच्या बॅटरीवर १५ वर्षांची लाइफटाइम वॉरंटी (अटी व शर्ती लागू) देण्यात आली आहे.
या वाहनात लेव्हल-२ एडीएएस (अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम) सारखे अद्ययावत फिचर्स आहेत. रस्त्यावरील ट्रॅफिकनुसार गाडीचा वेग आपोआप नियंत्रित होतो, तर लेन कीप असिस्ट हे फिचर गाडी योग्य लेनमध्ये ठेवण्यास मदत करते. मागील डिक्की स्वयंचलित उघडण्याची सुविधा देखील यात आहे. सर्वात नाविन्यपूर्ण फिचर म्हणजे, या गाडीचा वापर पॉवर स्टेशनसारखा करता येतो, ज्याद्वारे इतर उपकरणे किंवा वाहनांना ऊर्जा देता येते. एमजी मोटर्सने एमजी विंडसर ईव्ही प्रो मध्ये प्रथमच भारतात ही सुविधा सादर केली आहे. टेकवानी कुटुंबियांनी एमजी कंपनीच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून सरस्वती ग्रुपच्या विविध सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले.
या वाहनाचे आकर्षक डिझाईन, उत्कृष्ट तांत्रिक वैशिष्ट्ये आणि जबरदस्त परफॉर्मन्स यामुळे हे मॉडेल भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. लाँचिंगच्या दिवशीच ५० हून अधिक वाहन बुकिंग्जची नोंद झाली असून, यावरून या गाडीने ग्राहकांना पूर्णपणे भुरळ घातले असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. सरस्वती ग्रुप उत्तर महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह उद्योग समूह आहे. १९५१ साली दिवंगत तुलसीदास टेकवानी यांनी सुरू केलेल्या दुधाच्या व्यवसायातून सुरुवात करत आज सरस्वती डेअरी, सरस्वती फोर्ड, सरस्वती एंटरप्रायझेस आणि सरस्वती एमजी मोटर्स अशा यशस्वी उपकंपन्यांपर्यंत त्यांनी विस्तार केला आहे. सध्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व धवल टेकवानी करत आहेत. तुलसीदास टेकवानी यांच्या पहिल्या पिढीने लावलेल्या रोपाचे आज एका विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे.