जळगाव (प्रतिनिधी) – शहरासह व परिसरात गणरायाचे थाटात आगमन झाले .आज .बालक ,तरुण, वृद्ध सर्वांनी भक्ती भावाने श्री गणेशाची पूजा अर्चना करून स्थापना केली . जळगाव शहर संपूर्ण बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती खरेदी करण्यासाठी परिसरातील नागरिक बाजारपेठेत दाखल झाले होते. जळगाव शहरातील पोलिसांकडून चोख बंदोबस्त दिसला
जिल्ह्यात 2511 गणेश मंडळांची नोंदणी झालेली आहे त्यात सार्वजनिक १७१६ आणि ६४६ खाजगी मंडळे आहेत एक गाव एक गणपती अशी संख्या जिल्ह्यात १४९ गावांमध्ये आहे
पोलीस महासंचालक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्शवभूमीवर दिलेले आदेश जिल्ह्यात लागू आहेत समाजकंटक या काळात अफवा पसरवू शकतात त्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे सगळी काळजी घेण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत
यंदा सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीची उंची ४ फुटांपेक्षा जास्त नसावी आणि खाजगी गणेशमूर्तींची उंची २ फुटांपेक्षा जास्त नसावी असा नियम बंधनकारक करण्यात आला आहे मूर्तिकारांनाही तसा आदेश देण्यात आला आहे
जिल्ह्यात मुक्ताईनगर येथे दीड दिवसाचे १० गणपती बसवले जाणार आहेत , त्याचप्रमाणे जिल्ह्यात १८ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ५ दिवसांचे १७२ , २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ७ दिवसांचे २७७ , ४ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ८ दिवसांचे ३० , १४ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ९ दिवसांचे ११२ , ३५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १० दिवसांचे १९०८ आणि २ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ११ दिवसांचे २ गणपती बसवले गेले आहेत
गणेशोत्सव काळात मंडपांना किंवा मूर्त्यांना वाहनांचा धक्का लागून तणाव निर्माण होणे , मंडपांसमोर वैयक्तिक जुन्या भांडणातून मारामाऱ्या होणे , बाणेर फाडले जाणे आणि विसर्जन मिरवणूक रेंगाळत ठेऊन लोकांना वेठीस धरले जाणे , गुलाल उधळण्यावरून वाद होणे असे तणावाचे प्रसंग उद्भवू शकतात म्हणून पोलीस खात्याकडून काळजी घेतली जात आहे
जळगाव शहरासह फैजपूर आणि चोपडा येथे राज्य राखीव पोलीस दलाची प्रत्येकी १ तुकडी तैनात केली जाणार आहे जिल्ह्यात १६०० पुरुष आणि २०० महिला होमगार्ड बंदोबस्थसाठी तैनात करण्यात आल्या आहेत अतिरिक्त पोलीस दल म्हणून १ पोलीस अधीक्षक , २० प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षक , ११० कर्मचारी आणि १० प्रशिक्षणार्थी कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत .