जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील ट्रान्सपोर्ट नगरात ४९ वर्षीय व्यक्ती चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी १३ मे रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विनोद नामदेव बारी (वय-४९), रा. एसटी वर्कशॉप समोर, जळगाव असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
विनोद बारी हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान सोमवार १३ मे रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट नगरात ते पायी काही जात असताना त्यांना अचानक चक्कर आल्याने ते रस्त्यावर पडले. त्यांच्यासोबत असलेले रामकृष्ण नामदेव बारी व नारायण विष्णू बारी या दोघांनी त्याला खाजगी वाहनातून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून घोषित केले. दरम्यान या घटनेबाबत दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.