मोठी कारवाई : पक्षविरोधी कारवाया केल्याचा महानगर जिल्हाध्यक्षांचा ठपका
जळगाव ( प्रतिनिधी ) – आगामी जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक शिस्तीचा बडगा उगारला आहे. पक्षशिस्त मोडल्याचा आणि पक्षाच्या धोरणांविरुद्ध काम केल्याचा ठपका ठेवत जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी तब्बल २७ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.ह्यांनी विविध प्रभागातून उमेदवारी दाखल केली आहे.


जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून पक्षशिस्त, धोरणे व वरिष्ठ पातळीवर घेतलेल्या निर्णयांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले होते. या संदर्भात भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षाच्या प्रतिमेला तडा जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, त्या सर्वांचे प्राथमिक सदस्यत्व आणि त्यांच्याकडे असलेली सर्व पदे तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली आहेत.
“पक्षहित आणि संघटनात्मक शिस्त आमच्यासाठी सर्वोच्च आहे. शिस्तीचा भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. हा निर्णय पक्ष मजबुतीसाठी घेण्यात आला असून तो तात्काळ लागू करण्यात आला आहे,” असे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
हकालपट्टी केलेले बंडखोर उमेदवार
१. पाटील संगीता गोकुळ
२. हर्षदा अमोल सांगोरे
३. बाविस्कर धनश्री गणेश
४. बाविस्कर गणेश दत्तात्रय
५. सपकाळे रंजना भरत
६. कांचन विकास सोनवणे
७. शिंपी प्रमोद शांताराम
८. सपकाळे भरत शंकर
९. बागरे हिरकणी जितेंद्र
१०. चौधरी चेतना किशोर
११. बारी मयूर श्रावण
१२. पाटील तृप्ती पांडुरंग
१३. पाटील सुनील ज्ञानेश्वर
१४. विकास प्रल्हाद पाटील
१५. भोळे गिरीश कैलास
१६. कैलास बुधा पाटील (सूर्यवंशी)
१७. हेमंत सुभाष भंगाळे
१८. जितेंद्र भगवान मराठे
१९. प्रिया विनय केसवानी
२०. चौधरी रूपाली स्वप्नील
२१. अंजू योगेश निंबाळकर
२२. चौथै मयुरी जितेंद्र
२३. वंजारी जयश्री गजानन
२४. पाटील ज्योती विठ्ठल
२५. घुगे उज्वला संजय
२६. ढाकणे दिनेश मधुकर
२७. मोरे कोकीळा प्रमोद









