शारीरिक तपासणीत ७२ उमेदवार झाले बाद
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात पोलीस भरती सुरू झाली आहे. भरतीच्या दुसऱ्या दिवशी १००० उमेदवारांना बोलवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ६८१ उपस्थित राहिले. त्यापैकी ७२ उमेदवार छाती व उंची मध्ये व इतर गोष्टीत अपात्र ठरले तर ४ जणांना मैदानी चाचणीसाठी काही कारणास्तव पुढील तारीख देण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा पोलीस घटकांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी शारीरिक चाचणी दि. १९ पासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आले होते. तर दुसऱ्या दिवशी १ हजार उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात मैदानी चाचणीसाठी ६८१ उमेदवार उपस्थित होते. त्यामध्ये मैदानी चाचणीसाठी ६०९ उमेदवार पात्र ठरले असून ७२ उमेदवार अपात्र ठरले आहे.
पहिल्याच दिवशी ३१९ उमेदवार मैदानी चाचणीसाठी अनुपस्थित राहिले. तर चौघांना मैदानी चाचणीसाठी पुढील तारीख देण्यात आली आहे. मैदानी चाचणीची सुरुवात सकाळी साडेचार वाजेपासून पोलीस कवायत मैदानावर झाली. यावेळी संपूर्ण चाचणी ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत घेण्यात येत आहे.