जळगाव पोलिसांपुढे घरफोड्यांचे आव्हान कायम
जळगाव (प्रतिनिधी) : कुटुंबीयांसह फिरायला गेलेले असताना शहरातील एका प्राध्यापिकांच्या बंद घरातून सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाइल असा एकूण ३३ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरट्याने सोडून नेला आहे याप्रमाणे रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रा. सुरेखा पंडित पालवे (५४, रा. सुरेश नगर, महाबळ) यांनी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना सोमवारी दिनांक १७ जून रोजी उघडकीस आली. याप्रकरणी मंगळवार, १८ जून रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मू जे. महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या सुरेखा पालवे या ६ जून रोजी कुटुंबीयांसह फिरायला गेल्या होत्या.
त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून रोख एक हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने आणि मोबाइल असा एकूण ३३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सोमवार दिनांक १७ जून रोजी पालवे कुटुंबीय घरी आले. त्यावेळी चोरी झाल्याचे लक्षात आले. याविषयी प्रा. सुरेखा पालवे यांनी मंगळवार, १८ जून रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकों जितेंद्र राठोड करीत आहेत