• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हवेत गोळीबार करून दहशत पसरविणारा वाळूमाफिया अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 9, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
हवेत गोळीबार करून दहशत पसरविणारा वाळूमाफिया अटकेत

जळगाव एलसीबीची कारवाई, चांदसर येथे घडली होती घटना

जळगाव (प्रतिनिधी) : गिरणा नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा करीत असताना कोतवालाने फोटो काढले होते. त्यावर तेथील वाळूमाफियाने हवेत गोळीबार करून दहशत पसरवली होती. ही घटना चांदसर ता. धरणगाव येथे मंगळवारी दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी आता स्थानिक गुन्हे शाखेने गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीला अटक केली आहे.

संशयित आरोपी निवृत्ती उर्फ गोपाल गजानन सोनवणे (कोळी, वय ३२, रा. वाकटुकी, ता. धरणगाव), हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. चांदसर गावातील नदीपात्रातून वाळू उपसा होत होता. (केसीएन)तो रोखण्यासाठी गावाबाहेर चाऱ्या खोदून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अवैध वाळू उपसा बंद होता. अवैध वाळू उपसा करण्यासाठी वाकटुकी येथील काहीजण चाऱ्या बुजवत होते. याबाबत कोतवाल अमोल गुलाब मालचे यांना समजले. त्यांनी तेथे जाऊन त्यांना त्याचा जाब विचारला. याचा राग येऊन वाळू माफियांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याच वेळी गोपाल कोळी यानी त्यांच्याजवळील पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. यावेळी तेथे एकच खळबळ उडाली.

तर गावात त्याचा आवाज झाल्याने तेथेही धावपळ उडाली. हवेत गोळीबार केल्यानंतर ते पळून गेले. माहिती कळताच पाळधी दुरक्षेत्राचे पोलिस गावात पोहोचले. याबाबत पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.(केसीएन) संशयित आरोपी योगेश ईश्वर कोळी, आबा ईश्वर कोळी, गणेश सोमा कोळी, मोहन गोविंदा कोळी, कल्पेश महेश पाटील, राहुल भीमराव कोळी, राहुल दिलीप कोळी (सर्व रा. चांदसर, ता. धरणगाव) तसेच गोपाल कोळी, दीपक कोळी (दोन्ही रा. वाकटुकी, ता. धरणगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कोतवाल अमोल मालचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी संशयित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आदेश दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे, धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे आठवडे बाजारात संशयित फिरत असल्याचे कळताच पथकाने सापळा रचला व ताब्यात घेतले. (केसीएन)चौकशीदरम्यान संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गावठी कटटा, मॅगझीनसह २५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर संशयित आरोपीला पुढील तपासासाठी धरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

उद्योजकांसाठी उद्योग भवन व ट्रक टर्मिनल ठरणार वरदान !

Next Post

अट्टल दुचाकी चोरट्याला धरणगाव तालुक्यात शिताफीनं अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अट्टल दुचाकी चोरट्याला धरणगाव तालुक्यात शिताफीनं अटक

अट्टल दुचाकी चोरट्याला धरणगाव तालुक्यात शिताफीनं अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जैन कंपनी

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वडिलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरुणाला धक्का मारून पाडले; उजवा हात फ्रॅक्चर

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon