मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेवर कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेमार्फत पाणी नमुने गोळा करण्याकरिता उच्च प्रतीचा दर्जा असलेले बाटल्यांचे वितरण केले असूनही भूजल सर्वेक्षण विभागाच्या जिल्हा पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत मद्याच्या बाटलीमध्ये दूषित पाण्याचे नमुने प्राप्त असल्याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांनी तात्काळ वरिष्ठ भू वैज्ञानिक,भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेमार्फत एप्रिल महिन्यात पाणी नमुने घेण्याकरिता योग्य उच्च प्रतिचा दर्जा असलेले बाटल्याचे वितरण करण्यात आलेले होते. (केजीएन)यात १ लिटरची बाटली रासायनिक तपासणीसाठी एकूण ३ हजार ३४१ तर २५० मिली लिटरची बाटली जैविक तपासणीसाठी एकूण ६ हजार ६८२ बाटली असे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या जिल्हा प्रयोगशाळेत वितरीत करण्यात आले होते.
तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या आदेशान्वये त्यांना सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरण करणे बाबत सूचना देण्यात आल्या होत्या.(केजीएन)तथापि अद्यापही मद्याच्या बाटलीत पाणी नमुने प्राप्त झाल्याची माहिती मिळाल्याने त्याची गंभीर दखल जिल्हा परिषद प्रशासनातर्फे घेण्यात आली आहे. भू वैज्ञानिक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे यामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.