• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव पोलिसांनी उधळला गँगवार व तिहेरी हत्याकांडाचा कट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 12, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव पोलिसांनी उधळला गँगवार व तिहेरी हत्याकांडाचा कट

३५ लाखांची सुपारी घेणारे पाच शार्प शूटर अटकेत ; चार गावठी कट्टे, नऊ जिवंत काडतुसे, ६२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह ११ लाख ९९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/10/WhatsApp-Video-2026-10-12-at-14.51.33.mp4

जळगाव (प्रतिनिधी)- जळगाव पोलीस दलाने धाडसी आणि शिताफीची कारवाई करत जळगाव शहरात संभाव्य गँगवार आणि तिहेरी हत्याकांड घडवून आणण्याचा कट उधळून लावला आहे.

भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडात फरार असलेले कुख्यात गुन्हेगार बंटी पथरोड आणि शिव पथरोड यांनी भुसावळ येथील मिथुन बारसे, क्रिश बारसे आणि करण यांची हत्या करण्यासाठी ३५ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या सुपारीतील पाच लाख रुपये आगाऊ घेतल्याची माहितीही तपासात उघड झाली आहे.

दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात कार्यक्रमासाठी आलेल्या लक्ष्य व्यक्तींवर हल्ला करून त्यांना जीवे ठार मारणे आणि त्यांच्या अंगावरील सोने लुटण्याचा या आंतरजिल्हा टोळीचा कट होता. मात्र, रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वेळीच कारवाई करत हा गंभीर कट उधळून लावला.

दि.११ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पिंप्राळा परिसरातील भवानीमाता मंदिर ते सिल्लेमीलजवळील मोकळ्या जागेत पोलिसांनी सापळा रचला. यावेळी इनोव्हा कार (एमएच १९ एई १३५५) वर छापा टाकून पाच सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये खुशाल गजानन बोरसे (रा. खडक रोड, भुसावळ), संदीप बबन लोंढे (रा. वाघनगर, जळगाव), राजू उर्फ ओमकार भदरगे (रा. शास्त्रीनगर, ठाणे), अरविंद विजय कांबळे (रा. कासोळा, जि. वाशिम) आणि सोनू महेंद्र जयस्वाल (रा. सातिवली, वसई, जि. पालघर) यांचा समावेश आहे. या आरोपींकडून घटनास्थळी दोन गावठी कट्टे, सात जिवंत काडतुसे, धारदार सुरा, कोयता, मिरची पावडर, दोऱ्या, मास्क, पाच मोबाईल फोन आणि इनोव्हा कार असा एकूण नऊ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य, आरोपींचा सहभाग तसेच घरझडतीत आढळलेली शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ लक्षात घेऊन भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१०(४), ३१०(५), ६१(२), हत्यार कायदा कलम ३/२५ व ४/२५ तसेच एनडीपीएस कायदा कलम ८(क) आणि २२(क) या वाढीव कलमांची नोंद करण्यात आली आहे. या कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेले बंटी पथरोड, शिव पथरोड, अभिषेक गोयर आणि मध्यस्थ रवी होळकर यांचीही आरोपी म्हणून गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या तसेच फरार आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी गंभीर असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. संबंधित आरोपींविरुद्ध यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, चोरी आणि हत्यार कायद्यांतर्गत विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. मुख्य सूत्रधार बंटी पथरोड याच्याविरुद्ध १९, तर शिव पथरोड याच्याविरुद्ध १२ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.

जळगाव पोलिसांनी वेळेवर केलेल्या या धडक कारवाईमुळे जळगाव शहर आणि भुसावळ परिसरात संभाव्य गँगवार व तिहेरी हत्याकांड घडवून आणण्याचा कट उघडकीस आला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे चित्र असून, या प्रकरणातील अन्य बाबींचा तपास सुरू आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

पाचोऱ्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची चोरी; ११ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांनी उधळला गँगवार व तिहेरी हत्याकांडाचा कट
क्राईम

जळगाव पोलिसांनी उधळला गँगवार व तिहेरी हत्याकांडाचा कट

October 12, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
क्राईम

पाचोऱ्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची चोरी; ११ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

October 12, 2026
जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!
खान्देश

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 11, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई
क्राईम

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई

October 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलिसांनी उधळला गँगवार व तिहेरी हत्याकांडाचा कट

जळगाव पोलिसांनी उधळला गँगवार व तिहेरी हत्याकांडाचा कट

October 12, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

पाचोऱ्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची चोरी; ११ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

October 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon