• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव पोलिसांची ‘कम्युनिटी पोलिसिंग’कडे दमदार वाटचाल; एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 21, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव पोलिसांची ‘कम्युनिटी पोलिसिंग’कडे दमदार वाटचाल; एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न!


अनुभूती शिक्षण व संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजन; ४२ पोलीस अधिकाऱ्यांना संवाद कौशल्य, नेतृत्व विकास आणि सामाजिक जनजागृतीचे मार्गदर्शन

जळगाव ( प्रतिनिधी ) – पोलीस आणि नागरिक यांच्यातील परस्पर विश्वास, संवाद आणि सहकार्य अधिक दृढ करून समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी जळगाव पोलीस व अनुभूती शिक्षण व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कम्युनिटी पोलिसिंग’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील एकूण ४२ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/11/WhatsApp-Video-2026-11-21-at-13.41.33-1.mp4

लोकसहभाग वाढविणे, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग निर्माण करणे आणि पोलिसांविषयी समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून तसेच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेच्या प्रारंभी सहभागी अधिकाऱ्यांची नावनोंदणी व चहापान करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन, मान्यवरांचा परिचय आणि स्वागत समारंभ पार पडला. यानंतर विविध विषयांवरील मार्गदर्शन सत्रांना सुरुवात झाली.

तीन महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन

पहिल्या सत्रात विनय वसंत मावळणकर यांनी ‘संवाद कौशल्य आणि नेतृत्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रभावी संवादाचे महत्त्व, नेतृत्वगुणांचा विकास, संघभावना आणि समन्वयाच्या माध्यमातून कार्यक्षमता वाढविण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्रात सतीश भानुदास चिंचकर यांनी ‘कम्युनिटी पोलिसिंग’ या विषयावर मार्गदर्शन केले. पोलीस आणि समाज यांच्यातील समन्वय, नागरिकांचा सहभाग, जनतेशी संवाद आणि समाजाभिमुख पोलिसिंगचे महत्त्व त्यांनी विशद केले.

तिसऱ्या सत्रात प्रा. अमेय सुनील महाजन यांनी ‘कम्युनिटी पोलिसिंग : काळाची गरज आणि आपली भूमिका’ या विषयावर विचार मांडले. बदलत्या सामाजिक परिस्थितीत कम्युनिटी पोलिसिंगची आवश्यकता, नागरिक व पोलीस यांच्यातील विश्वासाचे नाते, सामाजिक जबाबदारी आणि लोकसहभागातून गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

गटचर्चेत सामाजिक समस्यांवर मंथन

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांचे विविध गट तयार करून त्यांच्यामार्फत ‘एक दिवसीय कार्ड शीट’च्या माध्यमातून दैनंदिन कामकाजात सहकार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर प्रात्यक्षिके व गटचर्चा घेण्यात आली.

यामध्ये आजूबाजूच्या परिसरातील समस्या, बाल लैंगिक अत्याचार, डायल ११२ अशा महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित समस्यांवर अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी नवीन कल्पना, उपाययोजना आणि नावीन्यपूर्ण बाबींवर विचारमंथन करण्यात आले.

या कार्यशाळेला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी असे एकूण ४२ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

कार्यशाळेच्या अखेरीस उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर समारोप समारंभ पार पडला. पोलीस अधिकारी आणि अंमलदारांमध्ये प्रभावी संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि नागरिकांशी समन्वय साधण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरली.

या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस निरीक्षक श्रेया, पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे यांच्या नेतृत्वाखाली तसेच पोलीस कर्मचारी चंद्रकांत राजपूत, जितेंद्र चौधरी, निलेश सिसोदे, मोनाली देशभाते, अश्विनी निकम आणि जागृती काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करून लोकसहभागातून गुन्हेगारीला आळा घालणे आणि सुरक्षित समाजनिर्मिती करणे, या दृष्टीने जळगाव पोलिसांचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.


 

 

Tags: #jalgaon police news #maharashtra #bharat
Previous Post

ऑपरेशन ऑल आऊटमध्ये दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; शस्त्रांसह पाच जणांना अटक!

Next Post

यावलच्या वाणी गल्लीतील गटार बांधकामासाठी १९ लाख ९० हजारांचा निधी मंजूर!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
यावलच्या वाणी गल्लीतील गटार बांधकामासाठी १९ लाख ९० हजारांचा निधी मंजूर!

यावलच्या वाणी गल्लीतील गटार बांधकामासाठी १९ लाख ९० हजारांचा निधी मंजूर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावलच्या वाणी गल्लीतील गटार बांधकामासाठी १९ लाख ९० हजारांचा निधी मंजूर!
खान्देश

यावलच्या वाणी गल्लीतील गटार बांधकामासाठी १९ लाख ९० हजारांचा निधी मंजूर!

November 21, 2026
जळगाव पोलिसांची ‘कम्युनिटी पोलिसिंग’कडे दमदार वाटचाल; एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न!
क्राईम

जळगाव पोलिसांची ‘कम्युनिटी पोलिसिंग’कडे दमदार वाटचाल; एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न!

November 21, 2026
ऑपरेशन ऑल आऊटमध्ये दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; शस्त्रांसह पाच जणांना अटक!
क्राईम

ऑपरेशन ऑल आऊटमध्ये दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; शस्त्रांसह पाच जणांना अटक!

November 20, 2026
आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
जैन कंपनी

आंतरजिल्हा वरिष्ठ गट पुरुष क्रिकेट निवड चाचणी रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी

November 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावलच्या वाणी गल्लीतील गटार बांधकामासाठी १९ लाख ९० हजारांचा निधी मंजूर!

यावलच्या वाणी गल्लीतील गटार बांधकामासाठी १९ लाख ९० हजारांचा निधी मंजूर!

November 21, 2026
जळगाव पोलिसांची ‘कम्युनिटी पोलिसिंग’कडे दमदार वाटचाल; एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न!

जळगाव पोलिसांची ‘कम्युनिटी पोलिसिंग’कडे दमदार वाटचाल; एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न!

November 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon