• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव परिमंडलात २२१ ग्राहकांना वीजजोडणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत संधी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 3, 2021
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – अनुसूचित जाती व जमातीच्या अर्जदारांना प्राधान्याने घरगुती वीज जोडणी देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने १४ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत जळगाव परिमंडलातील २२१ ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आली आहे.

येत्या ६ डिसेंबरपर्यत या योजनेचा लाभ घेता येणार असून गरजूनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी वीज जोडणी कार्यक्रम १४ एप्रिल ते ६ डिसेंबर अर्थात बाबासाहेबांची जयंती ते पुण्यतिथी या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला या योजनेत जळगाव परिमंडलात आजपर्यंत २२१ अर्जदारांना वीजजोडणी देण्यात आलेली आहे. यात जळगाव मंडलात १३२, नंदुरबार मंडलात ४८ तर धुळे मंडलात ४१ ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अर्जदाराकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, वीज जोडणीसाठी करण्यात येणाऱ्या विहित नमुन्यानुसार आवश्यक कागदपत्रे उदा.आधार कार्ड, रहिवासी दाखला इ. आवश्यक आहे. अर्जदारांनी वीजजोडणीसाठी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी. शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. लाभार्थ्यास ५०० रुपये अनामत रक्कम महावितरणकडे एकरकमी अथवा ५ समान मासिक हफ्त्यांमध्ये वीजबिलाद्वारे भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अर्जदाराचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर विद्युत नियामक आयोगाच्या तरतुदीच्या अधीन राहून वीजजोडणी उपलब्ध करण्यात येईल. ज्या अर्जदाराच्या घरी वीज जोडणी नाही अशा लाभार्थ्यांना विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसांत वीजजोडणी देण्यात येईल. अर्जदारास वीजजोडणीसाठी विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध करावी लागणार असल्यास महावितरणद्वारे स्वनिधी अथवा जिल्हा नियोजन विकास निधी अथवा इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधीमधून काम प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण करण्यात येईल व वीजजोडणी देण्यात येईल.


 

 

Previous Post

भवानीपूरच्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी

Next Post

दिग्दर्शक सागर भोगे यांचा जाहीर सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दिग्दर्शक सागर भोगे यांचा जाहीर सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक
1xbet russia

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

June 12, 2026
आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार
1xbet russia

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेची मंगलपोत लांबविली ; दोन महिला ताब्यात

June 12, 2026
पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

June 12, 2026
आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon