जळगाव ( प्रतिनिधी) – राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत तालुक्यातील शिरसोली येथे स्थानिक ग्रामपंचायत, साप्ताहिक केसरीराज व जळगावचे श्री साईलिला हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने 6 माचर्र्रोजी ( शुक्रवार) मोफत रोग निदान, शस्त्रक्रीया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री साईलिला हॉस्पीटलचे डॉ. भूषण झंवर यांनी सांगितले की, या शिबिरात गुडघेदुखी, कंबरदुखी, फ्रॅक्चर मॅनेजमेंट, वेडेवाकडे हात-पाय यावर इलाज, न जुळलेल्या हाडांवर उपचार, संधीवातावर उपचार केले जाणार आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात 6 माचर्र्रोजी सकाळी 9 ते 11 यावेळेत रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी यंत्रांनी केली जाणार आहे.रुग्णांनी जुनी फाईल, पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका, अंत्योदय किंवा अन्नपूर्णा योजनेचे कार्ड, आधारकार्ड किंवा मतदार कार्ड, बालरूग्णांसाठी जन्मतारखेचा दाखला सोबत आणावा. गरजू रूग्णांना मोफत औषधी दिली जाणार आहे. रुग्णांना ऑनलाईन मान्यता मिळाल्यानंतर मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळेल.
या शिबिराचा रूग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन शिरसोलीचे सरपंच रामकृष्ण काटोले, उपसरपंच सिंधुबाई मोरे, साप्ताहिक केसरीराजचे संपादक भगवान सोनार, डॉ. संजय पाटील (9822450808 ) यांनी केले आहे.