निवडणुकीसाठी ७ उमेदवारांनी १० अर्ज घेतले
जळगाव (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूककरीता पाचव्या दिवशी दि.२३ एप्रिल रोजी ७ उमेदवारांनी १० अर्ज घेतले. जळगाव लोकसभा मतदार संघासाठी ललित गौरीशंकर शर्मा या अपक्ष उमेदवाराने २ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांनी १ उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना करण पवार पाटील यांनी अ आणि ब फॉर्म सादर केलेला नाही.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दि. २३ एप्रिल रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ७ उमेदवारांनी १० अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी स्वामी पांडुरंग पाटील, जळगाव (अपक्ष), रोहन गणेश सोनवणे(अपक्ष), राहुल शशीकुमार सुरवाडे, जळगांव यांनी युवराज भीमराव जाधव, चाळीसगाव (वंचित बहुजन आघाडी) यांच्यासाठी, नंदू शामराव पाटील (अपक्ष), महेश सुपडू महाजन, जळगांव (अपक्ष), प्रा. प्रताप मोहन कोळी, जळगाव (अपक्ष), संग्रामसिंग सुरेश सूर्यवंशी जळगाव (अपक्ष) असे एकूण ७ उमेदवारांनी १० अर्ज घेतले आहेत.