१५० ते २०० हॉकर्सचा माल जप्त

जळगाव ( प्रतिनिधी ) ;- शहरासह जिल्ह्यात कोरोना काळातील लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता आली असली तरी नागरिक विनाकारण गर्दी करीत असल्याने आज मनपाच्या अतिक्रमण विभागाने जळगाव शहरात विविध ठिकाणी मोठी कारवाई करून १५० ते २०० हॉकर्स आणि अतिक्रमणधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
आज सकाळपासून शहरातील सुभाष चौक , भवानी पेठ, घाणेकर चौक, फ्रुट गल्ली, पोलनपेठ, कृषी उत्पन्न बाजार रस्त्याने असणारे भाजीपाला विक्रेते, रामानंद नगर, हरिविठ्ठल नगर , चित्रा चौक ते जीएस मैदान दरम्यान हि कारवाई करण्यात आल्याचे मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सांगितले.







