शहर पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : मंदिराच्या परिसरात सिगारेट ओढणाऱ्यांना हटकल्याचा कारणावरून एका तरुणाला तीन जणांनी मारहाण करून लोखंडी सुऱ्याने वार करून जखमी केल्याची घटना बुधवारी दि. २६ जून रोजी पहाटे ३ वाजता घडली होती. या गुन्ह्यातील तिघांना गुरूवार दि. २७ जून रोजी रात्री ८ वाजता शहर पोलिसांनी शनीपेठ परिसरातून अटक केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मयूर धरमदास सारवान (वय-१९, गुरुनानक नगर, जळगाव), अक्षय मुकेश अटवाल (वय-२३, शनिपेठ, जळगाव), निलेश नरेश हंसकर (वय-२३ रा. शनिपेठ) असे अटक केलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. ज्ञानेश्वर आधार सोनवणे हा तरूण बुधवारी दि. २६ जून रोजी पहाटे ३ वाजता ज्ञानेश्वर हा तरूण जळगाव रेल्वेस्थानकाजवळील हनुमान मंदीराच्या मोकळ्या जागेवर बसलेला होता. त्यावेळी अक्षय अटवाल मंदीराजवळ सिगारेट ओढत होता. त्यावेळी ज्ञानेश्वरने मंदिराच्या परिसरात सिगारेट ओढणाऱ्या अक्षयला हटकवले.
या रागातून अक्षय अटवाल यांच्यासह मयूर सारवान आणि निलेश हंसकर यांनी ज्ञानेश्वरला बेदम मारहाण केली. तर अक्षय अटवाल याने हातातील लोखंडी सुऱ्याने ज्ञानेश्वर वार करत त्याला जखमी केली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.