उत्तर महाराष्ट्र स्तरीय मेळावा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार
जळगाव;- येथील राष्ट्रीय संघर्ष समीती इपीएस ९५ निवृत्त कर्मचारी संघटनेचा जळगावात प्रथमच जिल्हास्तरीय मेळावा दि १२ रोजी आयोजीत करण्यात आलेला आहे.हा मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार १ जूलै रोजी जळगाव येथे बैठकीत करण्यात आला.
जळगाव जिल्हयातील इपीएस ९५ निवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हयातील पदाधिका—यांची बैठक नुकतीच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवीसिंग अण्णा, कोषाध्यक्ष भोजूसिंग गिरासे, जळगाव जिल्हाध्यक्ष सुधाकर भारंबे, उपाध्यक्ष रमेश नेमाडे, सचिव डी एन पाटील,कार्याध्यक्ष जळगाव जिल्हा संजीव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या बैठकीत १२५० रू पी एफ कपात होणा—या नवीन सदस्यांना संघटनेची माहिती देवून सभासद वाढीसाठी प्रयत्न करणे तसेच दि १२ जूलै रोजी प्रथमच जळगाव शहरात निर्धार मेळावा घेण्यात येणार असून आजी माजी सदस्यांनासह मोठया संख्येने उपस्थीत राहून हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सूचना करण्यात आलेल्या आहे. मेळाव्याला रा.सं.समीतीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राउत यांचेसह जळगाव जिल्हयातील नवनिर्वाचित खासदार केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे,खा. स्मीताताई वाघ व आमदार राजूमामा भोळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थीत राहणार आहे. याचबरोबर तालुक्यातील प्रत्येक आमदाराला देखिल उपस्थीत राहावे म्हणून निमंत्रणाची जबाबदारी ता. प्रमुखांना देण्यात आली. मेळाव्यासाठी समीती देखिल गठीत करण्यात आलेल्या असून पदाधिका—यांना याबाबत माहिती देखिल देण्यात आली. या मेळाव्यासाठी नविन सदस्यांना देखिल सोबत आणून हजारोंची उपस्थीती राहावी यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.