जळगाव (प्रतिनिधी) :- येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे जागतिक कर्करोग दिनानिमीत्त जळगाव खुर्द गावात रॅलीव्दारे जनजागृतीचा उपक्रम राबवण्यात आला.एम एस्सी व्दीतीय वर्षाच्या विदयार्थ्यांनी कर्करोग जनजागृती घोषवाक्य असलेले फलक घेत संपुर्ण गावात रॅली काढण्यात आली. यावेळी प्रा रेबेका लोंढे, प्रा. स्वाती गाडेगोणे, प्रा. स्नेहा लांडगे, प्रा वैष्णवी आणि प्रा मयुरी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विकास विदयालयातील ५ ते १० विदयार्थ्यांना तसेच गावातील नागरिकांना देखिल कॅन्सर या रोगाबददल माहिती देण्यात आली. महिलांमधील स्तन आणि गर्भाशय रोग तसेच पुरूषांना होणा-या विविध कॅन्सरच्या आजाराबददल माहिती देतांना याची कारणे, लक्षणे आणि उपचार याबददल माहिती दिली. रॅलीमध्ये जीएनएम तृतीय वर्षाच्या विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला. पोस्टर बॅनरव्दारे कॅन्सरच्या विविध स्टेजबददल माहिती देत कर्करोगासाठी कारणीभुत असलेल्या व्यसन व घटकांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.