भुसावळ प्रतिनिधी) :- देशाच्या गतिमान विकासासाठी पुन्हा एकदा मोदीजींचे नेतृत्वाची आवश्यकता असल्याने भारतीय जनता पार्टीच्या आदेशान्वये भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी ताई पाटील यांनी आज मंगळवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी भुसावळ शहरातील रानातला महादेव मंदिर परिसरात पुन्हा एकदा मोदी सरकार या घोष वाक्याने चे रेखाटन करत दिवार लेखन ” अभियानास प्रारंभ केला.
रावेर लोकसभा मतदारसंघातील भुसावळ विधानसभा क्षेत्रातील भुसावळ शहरात आज सर्व प्रथम भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी ताई पाटील यांनी महादेव मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर परिसरात स्थानिकांसमवेत दिवार लेखन अभियान सुरू केले. यात महिला देखील सहभागी झाल्या. यावेळी भाजप व्यापारी असोसिएशन व स्थानिकांच्या वतीने डॉ केतकी पाटील यांचा पुषगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या अभियानात बूथ क्रमांक 157 व 158 येथे दिवार लेखन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पाटील, भाजपा शहर उपाध्यक्ष चेतन दादा बोरोले, माजी नगरसेविका रेखाताई सुनील सोनवणे, स्वातीताई अजय श्रीगोंदेकर,, व्यापारी आघाडी अध्यक्ष जितू भैय्या माखीजा , व्यापारी आघाडीचे माजी शहराध्यक्ष केशव दादा गेलानी,श्री सचिन दादा पगारे यांच्या सह परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.