जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील गणेश कॉलनी भागात रहीवासी इस्त्रीचा व्यवसाय असलेल्यांचा मुलगा निलचंद परदेशी याने सी ए परिक्षेत उर्तीण होत यश मिळवले आहे.निलचंद परदेशी याची मोठी बहीण देखिल एम बी ए झाली असून एच डी एफ सी बँकेत नुकतीच नोकरीला लागली आहे. निलचंदचे आईबाबा देखिल अशिक्षीत असून घरीच इस्त्रीचा व्यवसाय करतात. दोघे भाउ बहीण वेळ मिळाला की आईवडीलांना मदत करत शिक्षणही पुर्ण केले.
निलचंदला पहिली पासून असलेली हुशारी पाहूनच त्यांच्या शिक्षणात आईवडीलांनी कोणतीच कसर ठेवली नाही असे करतांना मुलीच्या शिक्षणावरही त्यांनी भर दिला. १० वी १२ वी नंतर सी ए इंटर करत असतांना पदवीला देखिल प्रवेश घेत निलचंदने यश मिळवले. नुकताच सी ए परिक्षेचा निकाल जाहिर झाला आणि सी ए परिक्षेत पास झाल्याने निलचंदवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याला सीए करण काबरा सर आणि सीए पदमसिंह पाटील सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.