जळगाव (प्रतिनिधी)– मोबाईलच्या कामानिमित्ताने गोलाणी मार्केटमध्ये असलेल्या विद्यार्थ्याची सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार रविवारी 25 रोजी दुपारी उघडकीस आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्रताप राजू चौधरी रा. शनिपेठ हा शिक्षण घेत आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये शहरातील इलेक्ट्रिकच्या दुकानावर काम करुन जमविलेल्या पैशातून ५ हजार रुपये किमतीची सायकल खरेदी केली होती. एकूण २२ ऑक्टोबर रोजी प्रताप हा मोबाईलची बॅटरी बदलण्यासाठी गोलाणी मार्केट मध्ये गेला. या ठिकाणी त्याने गोलाणी मार्केटमधील डी विंगमध्ये असलेल्या मोबाइलच्या दुकानासमोरच सायकल उभी केली. मोबाईलच्या बॅटरीचे काम संपल्यानंतर तो पुन्हा सायकलजवळ आला. जागेवर त्याची सायकल दिसून आली नाही. प्रताप याने त्याचे वडील राजू चौधरी यांच्यासह शहर पोलीस ठाणे गाठले. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात नोंद करण्यात आली आहे.







