भाविकांनी लाभ घेण्याचे आ. राजूमामा भोळे यांचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : येथील श्री राधाराणी सेवा समिती, लोकशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आ. राजूमामा भोळे यांचे सहकार्याने शहरात डॉ. इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मधुर वाणीतून श्री शिवमहापुराण कथा दि. १४ ते २० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता जुने जळगाव परिसरात काशिबाई कोल्हे विद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. भाविकांनी कथाश्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. राजूमामा भोळे यांनी केले आहे.
प. पू. इंद्रदेवेश्वरानंद गुरुजींना राष्ट्रीय स्तरावर यज्ञपिठाधीश्वर धर्मसम्राट विद्यावाचस्पती श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी या उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. इंद्रदेवेश्वरानंद महाराज यांचे अनमोल प्रवचन जळगाव शहरवासीयांना ऐकायला मिळणार आहे. या अद्भुत पर्वणीवर जळगावकरांना उपस्थित राहून कथा श्रवण करण्याची संधी मिळत आहे. उद्या दि. १४ रोजी सुरुवातीला जुने जळगाव येथील श्रीराम मंदिर येथून सकाळी ९ वाजता कलशयात्रा काढण्यात येणार आहे.









