जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल एकवीरा येथून एकाची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज सतीश पाटील (वय 23, रा. अहुजा नगर) कुटुंबीयांसह राहतात. 7 सप्टेंबररोजी रात्री त्यांची 25 हजार रुपये किमतीची एमएच 19 डीई 2359 क्रमांकाची दुचाकी हॉटेलसमोर लावली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. राज पाटील यांच्या फिर्यादीनुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो हेकॉ अनिल मोरे करीत आहे.







