पुरुष उमेदवारांना हजर राहण्याच्या सूचना
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणीची अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड झालेल्या पुरुष उमेदवारांना हजर राहण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत.
महिला उमेदवारांसाठी नंतर तारीख देण्यात येणार आहे. तसेच प्रतीक्षा यादीदेखील लवकरच जाहीर होणार आहे. त्यानुसार जळगाव, भुसावळ, वरणगाव, मुक्ताईनगर, रावेर, सावदा, फैजपूर, यावल या पथकातील पुरुष उमेदवारांनी १९ सप्टेंबर रोजी तर अमळनेर, चोपडा, धरणगाव, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर येथील पथकातील पुरुष उमेदवारांनी २० सप्टेंबर रोजी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा समादेशक अशोक नखाते यांनी केले आहे.