बहिणाबाई चौधरींच्या जयंतीनिमित्त २४ ऑगस्टला आयोजन
‘निसर्गकन्या’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहिणाबाईंच्या ओव्या आजही जनमानसात जीवंत आहेत. त्यांच्या काव्य साहित्यातून श्रमजीवी जीवन, निसर्गाचे सौंदर्य, स्त्रियांचे भावविश्व आणि ग्रामीण संस्कृती यांचे प्रतिबिंब उमटते. या काव्यसंध्या मध्ये प्रांतातील नामवंत कवी, नवोदित कवयित्री आणि बहिणाबाईंच्या प्रेरणेने स्फुरलेले शब्दकार सहभागी होतील. सायंकाळी आयोजलेल्या कार्यक्रमास किरण डोंगरदिवे, बुलढाणा, रेणुका पुरोहित, पुणे, श्रध्दा कुळकर्णी, विमल वाणी, माया धुप्पड या मान्यवरांचा सहभाग असणार आहे,
श्रावणातले आल्हाददायक, निसर्गसौंदर्य, मातीचा गंध आणि अंतर्मनाची ओल यांसारख्या विविध विषयांवरील विविध बाज असलेल्या कविता रसिकांसमोर सादर होतील. साहित्यप्रेमी, रसिक श्रोते आणि काव्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बहिणाबाईंच्या स्मृतीला काव्याभिवादन करावे, असे आवाहन बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचे समन्वयक अशोक चौधरी यांनी केले आहे.