एरंडोल ;- एरंडोल तालुका मेडिकल असोसिएशन, सुखकर्ता फाउंडेशनतर्फे रविवारी दुपारी ४ ते ६.३० या वेळेत पांडववाड्यात म्युकरमायकोसिस रोगनिदान व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
म्युकरमायकोसिस ह्या बुरशीजन्य व जीवघेण्या अशा आजाराचा यात समावेश आहे . जळगाव जिल्ह्यातही अश्या रुग्णाची संख्या प्रचंड वाढत असल्यामुळे या आजाराबाबत जागरूकता असण्यासाठी आणि त्वरित निदान होणेसाठी हे शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.
या रोगनिदान व मार्गदर्शन शिबिरात जळगाव येथील नेत्ररोगतज्ञ् डॉ. धर्मेंद्र पाटील,डॉ. राहुल मयूर (पॅथॉलॉजिस्ट), डॉ.नरेंद्र ठाकूर ( भूलवैद्यकतज्ञ्), एरंडोल येथील दंतरोगतज्ञ् डॉ. मकरंद पिंगळे, डॉ. इब्राहिम बोहरी हे म्युकरोमायकोसिस संदर्भात व एरंडोल येथील फिजिशियन डॉ. फरहाज बोहरी, डॉ. स्नेहल पाटील, डॉ. सुयश पाटील हे पोस्ट कोव्हीड लक्षणे अन आजार ह्याबाबत मार्गदर्शन व तपासणी करणार आहेत.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी, त्यांच्या जवळील नातेवाईकांनी, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्तींनी ह्या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा त्याचबरोबर अश्या संशयित रुग्णांना ह्या शिबिराचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन एरंडोल तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुधीर काबरा, सचिव डॉ. राहुल वाघ, सुखकर्ता फाउंडेशन चे डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ. गीतांजली ठाकूर ह्यांनी केले आहे.
शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांना कोरोना प्रतिबंधनात्मक ‘त्रिसूत्री’चा वापर केल्यानंतरच प्रवेश दिला जाणार असल्यामुळे योग्य ती काळजी घेऊन व उपचाराची जुनी कागदपत्रे घेऊनच नागरिकांनी ह्या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे.