• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना ३१. ६१ कोटींच्या निधी वितरणास पालकमंत्र्यांची मान्यता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 28, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव;- अनुसूचित जाती उपयोजना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका/ नगरपंचायतींसाठी (नागरी स्थानिक स्वराज्य संस्था) सन 2021-22 मधील प्रस्तावित 31.61 कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात समितीची जिल्हास्तरीय बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या बैठकीस आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) सतीश दिघे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्तीत सुविधा पुरविण्यासाठी जळगव शहर महानगरपालिकेस 5 कोटी रुपयांचा तर जिल्ह्यातील 18 नगरपालिका/नगरपंचायतींना 26.61 कोटी रुपये असा एकूण 31.31 कोटी रुपयांचा निधी अनुसूचित जाती उपयोजनेतून मंजूर झाला आहे.
त्यानुसार भुसावळ नगरपालिकेस 8 कोटी 95 लाख, अमळनेर 2 कोटी 25 लाख, चाळीसगाव 3 कोटी 20 लाख, चोपडा 1 कोटी 70 लाख, पाचोरा 1 कोटी 85 लाख, जामनेर 1 कोटी 15 लाख, पारोळा 52 लाख, धरणगाव 62 लाख, एरंडोल 65 लाख, यावल 85 लाख, रावेर 65 लाख, फैजपूर 53 लाख, भडगाव 60 लाख, वरणगाव 1 कोटी 15 लाख, बोदवड नगरपंचायत 65 लाख, मुक्ताईनगर नगरपंचायत 80 लाख, शेंदूर्णी नवनिर्मित नगरपंचायत 49 लाख 91 हजार 225 रुपये असा एकूण 26 कोटी 61 लाख 91 हजार 225 रुपयांचा निधी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामधील अनुसूचित जाती लोकसंख्येच्या प्रमाणातवितरीत करण्यास आजच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.या निधीतून नागरी क्षेत्रात नागरीकांसाठी चांगल्या दर्जाच्या मुलभूत सोयीसुविधा उभारण्याच्या सूचनांही पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्यात.
जळगाव शहरात 4 कोटी 17 लाखांच्या कामास मान्यता
महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोईसुविधांच्या विकास योजनेत जळगाव शहर महानगरपालिकेस सन 2016-17 या वर्षात प्राप्त झालेल्या 25 कोटी रुपयांच्या अनुदानातून शिल्लक राहिलेल्या 4.17 कोटी रुपयांच्या अनुदानातून महासभा ठराव क्र. 365 दि. 3 फेब्रुवारी, 2021 व महासभा ठराव क्र. 488, दि. 15 मे, 2021 नुसार नवीन विकास कामे प्रस्तावित केलेली आहेत. यात वार्ड क्रं. 19 अंतर्गत येत असलेल्या सुप्रिम कॉलनीत व आजुबाजुच्या परिसरात अस्तित्वात असलेल्या पोलांवर स्ट्रिट लाईट फेज वायर ओढून पथदिव्याची व्यवस्था करणे, जळगाव शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूलाच्या (रेल्वे लेव्हल क्रॉसिंग 420 -9/11) जोडरस्त्याच्या संरेखेच्या मार्गातील उच्चदाब/लघुदाब वीज वाहिनी स्थलांतरीत करणे, प्रभाग क्र. 2 कांचन नगर, चौघुले प्लॉट परिसरातील रस्ते डांबरीकरण करणे, जळगाव शहरात आवश्यक ठिकाणी स्त्री व पुरुषांकरीता स्वच्छतागृह/ युरिनल्सची व्यवस्था करणे, डी मार्ट ते रामेश्वर कॉलनीतील आदित्य चौक पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, पिंप्राळा स्मशानभुमी सुशोभीकरण करुन विकसित करणे, प्रभाग क्र. 12 मधील रामदास कॉलनी ओपनस्पेस येथे संरक्षण भिंत बांधणे आदि कामांना आजच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी मान्यता दिली.


 

 

Previous Post

गफ्फार मलिक यांच्या अंत्ययात्रेला झालेल्या गर्दीबाबत दाखल गुन्ह्यातून मलिक यांच्या मुलांची नावे वगळा -फारूक शेख

Next Post

मराठा आरक्षणासाठी संभाजी राजेंनी सुचवले तीन पर्याय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मराठा आरक्षणासाठी संभाजी राजेंनी सुचवले तीन पर्याय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon