धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय साळवे, येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या गुलाबराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अध्यक्ष प्रतापराव पाटील यांनी विद्यालयात माजी सरपंच संजय नारखेडे यांच्यामार्फत गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले.
चेअरमन डॉ. गिरीश नारखेडे म्हणाले की, विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्य यापासून प्रेरणा मिळते. या वेळी ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ. गिरीश नारखेडे, साळव्याचे सरपंच पती संजय कोल्हे, साळव्याच्या उपसरपंच बलमाबी पटेल, निशाणेच्या सरपंच कल्पना पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख पुष्पा पाटील, प्रल्हाद कोल्हे व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. मोरे, ज्येष्ठ शिक्षक जी. व्ही. नारखेडे, एस. पी. तायडे, एस. व्ही. राठोड, व्ही. एस. कायंदे, बी. आर. बोरोले. शिक्षिका नीता पाटील, रंजना नेहेते, प्रतिभा पाटील, गुणवंती पाटील व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक व्ही. के. मोरे यांनी केले. वह्या मिळाल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा लक्षणीय होता. विद्यार्थ्यांनी लेखन, सुलेखन, हस्ताक्षर सुधारून गृहपाठ पूर्ण करावे. यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते, असे मुख्याध्यापकांनी सांगितले.