कारागृह अधीक्षकांचा महाराष्ट्र शासन सुधारणा ,पुनर्वसन कारागृह व सुधारसेवा विभागाकडे खुलासा
जळगाव (प्रतिनिधी ) ;- जिल्हा कारागृहात आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खरात हत्याकांडातील एका बॅरेक मध्ये असलेल्या न्यायालयीन कैदीने दुसऱ्या बॅरेकमध्ये जाऊन सह आरोपी असलेल्या कैदीवर धारदार वस्तूने वार करून त्याची हत्या झाल्याची घटना घडली . याबाबत तुरुंग अधीक्षक अनिल वांधेकर यांनी महाराष्ट्र शासन सुधारणा व पुनर्वसन कारागृह व सुधारसेवा विभागाकडे खुलासा सादर केला आहे.
त्यात म्हटले आहे कि, बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ गुन्हा रजिस्टर नंबर २२२/२०१९ स्पेशल केस क्र ०२/२०२० कलम ३०२,३०७,१२० ब ४/२५ आर्म ऍक्ट मधील न्या. बंदी क्र.३३८/२४ मोहसिन अजगर खान याचे मृत्यु बाबत. उपरोक्त संदर्भाकित विषयान्वये सविनय सादर करण्यात येते की, न्यायायालयीन बंदी क्रमांक ३३८/२०२४ मोहसिन अजगर खान, वय २६ वर्ष हा व इतर २ सहआरोपी (न्या. बंदी क्र. २४९६/२०१९ शेखर हिरालाल मोघे व न्या. बंदी क्र. २४९८/२०१९ मयुरेश मुरेश सुरवाडे) बाजारपेठ पोलीस स्टेशन, भुसावळ कडील गु.र.नं २२२/२०१९, सेशन केस क्र ०२/२०२० कलम ३०२,३०७, १२०ब भा द वि व आर्म ऍक्ट ४/२५ मध्ये जिल्हा न्यायाधीश ३ व अति. सत्र न्यायालय, भुसावळ जि. जळगाव यांचे आदेशान्वये दिनांक १४.१०.२०१९ या कारागृहात दाखल झाले होते. सदर बंदी मोहसिन अजगर खान व इतर ४ सहआरोपी हे भुसावळ येथील रविंद्र खरात (नगरसेवक) या गाजलेल्या हत्याकांडतील असल्याने त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव दिनांक २६.१२.२०१९ रोजी जिल्हा सत्र न्यायालय, भुसावळ व कारागृह उपमहानिरीक्षक, मध्य विभाग, औरंगाबाद यांचे आदेशान्वय नाशिकरोड मध्यवती कारागृह येथे वर्ग करण्यात आलेले होते. त्यानंतर सदर ०५ न्या. बंदी यांना न्यायालयाच्या प्रलंबित केस कामो दिनांक ०७.११.२०२३ रोजी न्यायालयाच्या आदेशान्वये पुन्हा नाशिकरोड मध्यवत्तों कारागृह येथुन पुन्हा जळगाव जिल्हा कारागृह येथे दाखल करण्यात आले.
जळगांव जिल्हा करागृहात एकुण सेप्रेट विभागत एकुण ६ बॅरेक आहेत. त्यामध्ये बॅरेक क्र. ३ मध्ये न्या. बंदी शेखर हिरालाल मोघे, आकाश सुखदेव सोनवणे व निलेश चंद्रकात टाकुर यांना बंदीस्थ ठेवण्यात आले होते. तसेच सेनेट विभागात क्र. ४ मध्ये न्या. बंदी अरबाज अजगर खान, न्या. बदी मोहासिन अजगर खान व मयुरेश रमेश सुरवाडे हे बंदी बंदिस्थ ठेवण्यात आले होते. तसेच आज रोजी एकूण १२ बंदी हे सेप्रेट विभागत बंदीस्थ होते.
आज दिनांक १०.०७.२०२४ रोजी कारागृहातील ओपनींग झाल्यानंतर अधिकारी कर्मचारी कारागृहाची ओपनींगची खात्री झाल्यानंतर घरी गेले. त्यांनतर सकाळी ७.५५ ते ८.०० वाजेच्या दरम्यान सेप्रेट मधील बेरक क्र. ०३ मधील न्या. बंदी शेखर हिरालाल मोघे हा सेप्रेट मधील बेरक क्र. ४ मध्ये गेला. बॅरेक क्र. ४ मध्ये न्या. बंदी मोहसिन अजगर खान हा झोपला असताना न्या. बंदी शेखर हिरालाल मोघे याने त्याच्यामध्ये घरगुती वादातुन रागात येऊन न्या बंदी मोहसिन अजगर खान याच्यावर धारदार वस्तुने वार केल्यामुळे सदर बंदयाचे अंगावर रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्यास तातडीने शासकीय वैद्यकीय महाविदयाल व रुग्णालय, जळगांव येथे उपचाराकरीता सकाळी ८.०६ वाजाता पोलीस कर्मचारी विनोद सोनवणे, पोलीस कॉस्टेबल. पोलीस मुख्यालय जळगांव व कारागृहातोल कर्मचारी गणेश पाटील, कारागृह शिपाई,समाधान सोनवणे, होमगार्ड यांच्या मार्फत पाठविण्यात होते. दरम्यानच्या काळात कारागृहातील अधिकारी/कर्मचारी हे
तात्काळ कर्तव्यावर हजर झाले. सदर बंद्यास शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथील वैद्यकिय अधिकारी यांनी वैद्यकिय औषधोपचाराकरीता अंतरुग्ण म्हणुन दाखल करुन घेण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकारी अश्विन देवचे यांनी न्या. बंदी क्र ३३८/२४ मोहसिन अजगर खान यास मयत घोषित केल्याचे कर्तव्यावरील गणेश राजेंद्र पाटील, कारागृह शिपाई यांनी दिनांक १०.०७.२०२४ रोजी सकाळी ८.३१ वाजेच्या दरम्यान कारागृहाचे वरिष्ट तुरुंगाधिकारी गजानन विठ्ठल पाटील यांना दुरध्वनीवर कळविलेले आहे.असा खुलासा तुरुंग अधीक्षक अनिल वांधेकर यांनी या हत्ये प्रकरणानंतर सादर केला आहे.