पाचोरा;- शेतकरी शेतात काम करत असतांना रानडुकराने हल्ला करून मांडीवर चावा घेवून जखमी केल्याची घटना तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे घडली असून आबा तुळशीराम पाटील रा. सातगाव डोंगरी असे शेतकऱ्याचे नाव आहे.

आबा पाटील हे २४ एप्रिल रोजी दुपारी आबा पाटील सातगाव शिवारातील आपल्या शेतात काम करत असतांना अचानक बामनी नदीतून धावत येऊन रानडुकराने त्यांच्यावर झडप घातली. रानडुकराने शेतकऱ्याच्या गुडघ्याच्या वर मांडीवर जोरदार चावा घेत शेतकरी जमिनीवर कोसळताच डुकराने तेथून पळ काढला.







