जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) :- रामानंद नगर पो. स्टेचा अजून एक धोकादायक इसम नामे मयुर ऊर्फ विक्की दिलीप अलोणे (वय-३१ वर्षे रा. जळगांव) याचे वर एमपीडिएची कारवाई करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले आहेत.
रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील अट्टल गुन्हेगार धोकादायक इसम नामे मयुर ऊर्फ विक्की दिलीप अलोणे याचे वर रामानंद नगर पोलीस स्टेशन तसेच जळगांव शहर पोलीस स्टेशन, भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशन व शनीपेठ पोलीस स्टेशन येथे याचे वर ६ गंभीर स्वरुपाचे गुन्हे जसे खुनाचा प्रयत्न करणे, शस्त्र अधिनियमाचे उल्लंघन करणे, शस्त्रानिशी दरोडा घालणे, सार्वजनिक जागी जुगार खेळणे व लोकांना परिसरात सामान्य लोकांना धमकावत असे व त्यांना त्याच्या कडील शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या कडुन पैसे घेत होता.कोणी त्यास नकार दिल्यास तो त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यास मारहान करीत होता.
त्यासाठी, त्याच्यावर कायद्याचा वचक रहावा व भीती रहावी तसेच त्याच्या हातुन सामान्य लोकांच्या जिवीतास व मालमत्तेस नुकसान होऊ नये याकरीता पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी सदर इसमाची आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी काढून पोलीस अधिक्षक एन. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित तसेच पोलीस निरीक्षक नजन पाटील, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांचे मोलाचे मार्गदर्शन घेतले.
गुन्हेगार मयुर ऊर्फ विक्की दिलीप अलोणे याला एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करुन मध्यवर्ती कारागृह, कोल्हापुर येथे स्थानबध्द करण्यात आले आहे. कार्यवाही करतांना पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, पोहेकॉ संजय सपकाळे, पोहेकॉ / सुशिल चौधरी, पोहेकॉ / सुनिल दामोदरे (स्थानिक गुन्हे शाखा जळगांव) पोना/ रेवानंद साळुखे, पोना/ हेमंत कळसकर, पोना/विनोद सूर्यवंशी, पोकों/ रविंद्र चौधरी, पोकों/उमेश पवार, पोको/जुलालसिंग परदेशी, पोकों/ इरफान मलिक, पोकॉ किरण पाटील व स्थानिक गुन्हे शाखा पोकों/ ईश्वर पाटील यासर्वांनी महत्वाची भुमीका पार पाडली आहे.
तसेच सदर आदेश झाले नंतर त्यास मध्यवर्ती कारागृह कोल्हापुर येथे स्थानबध्द करणे करीता सहा. पोलीस निरीक्षक, रोहिदास गमाले यांचे सोबत पोलीस स्टाफ पाठवून त्यास स्थानबध्द करणे करीता रवाना केले.