• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 20, 2020
in जळगाव
0

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश

जळगाव, (प्रतिनिधी) – औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यास सर्व संबंधित विभागांनी प्राधान्य द्यावे. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले.

येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हा सल्लागार समिती, जिल्हास्तरीय स्थानिक लोकांना रोजगार समिती, जिल्हास्तरीय आजारी उद्योग पुनरुज्जीवन समिती सभा, जिल्हास्तरीय निर्यात प्रचालन समितीची सभा संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा उद्योग मित्र समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील आदि उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्याचा आर्थिक विकास होण्यसाठी बेरोजगारांच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. रोजगारासाठी जिल्ह्यात मोठे उद्योग आले पाहिजे, जे उद्योग आहेत ते चांगल्या प्रकारे चालले पाहिजेत. व नवउद्योजकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. याकरीता त्यांना आवश्यक असलेल्या रस्ते, वीज व पाणी या मुलभूत, पायाभूत सुविधा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महानगरपालिका, विद्युत वितरण कंपनी यांनी तातडीने उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. याकरीता सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ते नियोजन करावे. उद्योजकांच्या अडचणी सोडविताना त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना सर्व विभागांना दिल्यात. त्याचबरोबर उद्योजकांनीही आपल्या उद्योगात स्थानिक बेरोजगारांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी उद्योजकांना केले. जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यकता भासल्यास उद्योगमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यात जास्तीत जास्त बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरीता जिल्ह्यात पंतप्रधान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. यासाठी जिल्हा उद्योग केंद्र आणि कौशल्य विकास विभागाच्यावतीने उद्योजकता परिचय कार्यक्रम तसेच रोजगार मेळाव्यांचे आयोजन करावे. या मेळाव्यांमध्ये तरुणांना उद्योग व रोजगाराचे प्रशिक्षण देण्यात यावेत. त्यांना प्रशिक्षित करुन स्वयंरोजगाराकडे वळवावे अशा सुचनाही पालकमंत्री यांनी सर्व संबंधितांना दिल्यात.

या बैठकीत दि. इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडिस्ट्रीज संघटना यांनी विद्युत वितरण कंपनी विद्युत भार कमी करणे, अतिरिक्त लावलेले मागणी शुल्क परत न देणे, वीज ग्राहकाची वर्गवारी बदलल्यानंतर फरकाची रक्कम परत न मिळणे, वीज जोडणी वेळेत न मिळणे, लघु उद्योग भारती संघटनेच्यावतीने औद्योगिक वसाहतीमधील बंद पथदिवे सुरु करणे, काशिनाथ हॉटेलकडून एम सेक्टरकडे जाणेसाठी रस्ता बनविणे, औद्योगिक वसाहतीत पाण्याच्या निचरा होण्यासाठी गटारी बांधणे, औरंगाबाद महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे आदि विविध विषय बैठकीत उपस्थित केले.

बैठकीच्या प्रास्ताविकात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. दंडगव्हाळ यांनी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना स्वावलंबी बनविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची माहिती विशद केली. तसेच जिल्ह्यात विशाल व मोठे 18 उद्योग असून यामध्ये 8994 इतका रोजगार उपलब्ध असून त्यापैकी 8163 स्थानिक लोकांना रोजगार दिलेला आहे. तर स्क्षुम, लघु व मध्यम 37833 उद्योग असून यामध्ये 1 लाख 46 हजार 637 रोजगार असून त्यापैकी 1 लाख 31 हजार 973 स्थानिक लोकांना रोजगार देण्यात आल्याची माहिती दिली.

या बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, वीज वितरण कंपनी, महानगरपालिका, शासनाचे विविध विभाग व महामंडळ, जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांचे, संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


 

 

Previous Post

जळगावातून ट्रकच्या बॅटऱ्या लांबविल्या

Next Post

भरीताचे वांगी विक्री दालनाचे कृषिमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भरीताचे वांगी विक्री दालनाचे कृषिमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा
1xbet russia

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon