• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

गुलाबी बोंड अळी शेतकऱ्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज – डॉ.भागीरथ चौधरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2023
in Uncategorized
0

पळासखेडेला कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा
जळगाव (प्रतिनिधी) – कापूस पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसत असताना शेतकरी त्याबाबत सतर्क नाहीत, गुलाबी बोंड अळी करीता शेतकऱ्यांनी जागरूक राहीले पाहीजे, त्यामुळे उत्पादन तर कमी मिळेल शिवाय कापसाची गुणवत्ता चांगली मिळणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज आहे. असे संचालक भागीरथ चौधरी ह्यांनी दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्र जोधपूर आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लि ह्यांच्या संयुक्त वतीने पळासखेडे (मिराचे) ता. जामनेर येथील दिनेश पाटील ह्यांच्या कापूस शेतामध्ये आयोजीत ‘कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी जागरूकता आणि व्यवस्थापन’ याविषयावरील शेतकरी मिळाव्यात त्यांनी संबोधीत केले.
त्यांच्या बंधन प्रकल्पात कापूस पिकातील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनाकरीता त्यांच्या संस्थेकडून १२ कापूस शेतकऱ्यांच्या समुहाला ६० एकर कापूस क्षेत्राकरीता जपानी तंत्रज्ञान पी बी नॉट व कामगंध सापळे ह्या नवीन तंत्रज्ञानाचा विनामुल्य वापर करण्यात आला. कापूस हे राज्यातील महत्वाचे नगदी पीक असुन कापसाची उत्पादकता खुप कमी आहे.
कापूस पीक आता फुल आणि बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी कापूस पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव आढळून आला आहे आणि कोठेही कापूस पिकांत कामगंध सापळे लावण्यात आलेले नाही. राज्यात २०१४ पासुन गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. कापूस लावणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने कापूस पिकाचे आर्थिक नुकसान टाळण्याकरीता कापूस पिकात गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनात पिकामध्ये निरीक्षण करून गुलाबाच्या कळी प्रमाणे असणाऱ्या डोमकळ्या तोडून नष्ठ कराव्यात, एकरी ५ कामगंध सापळे लावावेत, निंबोळी अर्काची फवारणी करावी. अंडी नाशक किटकनाशकाची फवारणी करावी, असे विचार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ व कृषिविद्या, विस्तार आणि प्रशिक्षण विभाग प्रमुख डॉ. बी. डी. जडे ह्यांनी मार्गदर्शनात मांडले.एस.ए.बी.सी.चे शास्त्रज्ञ डॉ.दिपक जाखड ह्यांनी कापूस पिकामध्ये पी बी नॉट चा वापर व कामगंध सापळे कसे लावावेत ह्याचे प्रात्यक्षिक दाखविले. जैन इरीगेशन कंपनीचे सामाजीक कार्य खुप कौतुकास्पद आहे. ठिबक सिंचनाचा व्यवसाय करणारी ही कंपनी कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीच्या समस्यावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करीत असल्याचे बघून तसेच नविन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे मोठं काम जैन इरीगेशन करीत आहे, असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जळगाव जिल्हा कृषि विभाग आत्मा चे प्रकल्प संचालक रविशंकर चलवादे ह्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचीही माहीती शेतकऱ्यांना दिली.हे नविन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी खुप उपयुक्त ठरणार आहे ह्या करीता जैन इरिगेशन आणि दक्षिण आशिया जैव तंत्रज्ञान संस्था चे आभार मानताना दिनेश पाटील ह्यांनी मनोगत व्यक्त केले.ह्या उपक्रमामध्ये समाविष्ठ शेतकरी दिनेश पाटील, भगवान राजपूत, संजय पाटील, देवानंद पाटील, जगन गायके, प्रभाकर पाटील, बळीराम माळी, गोपाळ राजपूत, दिवाकर पाटील, नाना शिंदे, प्रमोद पाटील ह्यांचा सत्कार करण्यात आला. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे विभागीय व्यवस्थापक डी. एम. बऱ्हाटे, मनोज पाटील, तुषार पाटील, जैन ठिबक वितरक अजय पाटील, सुशांत चतुर (नेरी), पी. के. पाटील (जळके) तसेच परिसरातील कापूस शेतकरी उपस्थित होते.

 

Tags: #jain #jainirrigationjalgaonhttps://kesariraj.com/gulabi-bond-ali-shetkaryani/
Previous Post

गुंड त्रास देताय ? कोणी धमक्या देतंय ? मग नक्की या !

Next Post

ग्रामसेवकाच्या “दांड्यां”ना ग्रामस्थ कंटाळले, चहार्डी गाव अनाथ घोषित करा !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ग्रामसेवकाच्या "दांड्यां"ना ग्रामस्थ कंटाळले, चहार्डी गाव अनाथ घोषित करा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon