बिले घेणाऱ्या ८४ जणांकडून होणार कर वसुलीची धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणार्या जळगावातील मे. स्वामी ट्रेडिंग कंपनी या बोगस मालकावर जळगाव जीएसटी विभागाच्या अन्वेषण विभागाने गुरुवारी दिनांक १ ऑगस्ट रोजी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. धनगर यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मालाची विक्री न करता खोटी बिले देऊन बनावट कर वजावटीचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. त्यांनी ८४ जणांना बोगस बिले दिली असून या ८४ जणांना शुक्रवारी दि. २ ऑगस्ट पासून कर वसुली करण्याबाबत नोटीसा देण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
नामदेव दौलत धनगर (वय ४८, रा. सुटकार ता. चोपडा) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते मे.स्वामी ट्रेडिंग कंपनीचे मालक आहेत मात्र कुठल्याही मालाची विक्री ते करीत नाही. बिल देणे व घेणे करतात. (केसीएन)नामदेव दौलत धनगर यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मालाची विक्री न करता तब्बल ६५ कोटीची खोटी बिले ८४ जणांना देऊन शासनाची १२ कोटी ६५ लाख रुपयांची कर महसूल हानी केली. धनगर यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतुदीचे उल्लंघन केल्याने त्यांना १ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली.
संशयित आरोपी नामदेव धनगर यांची वैद्यकीय तपासणी करून न्यायमूर्ती केळकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई राज्यकर सहआयुक्त सुभाष परशुराम भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त सूर्यकांत युवराज कुमावत यांच्या नेतृत्वात सहायक राज्यकर आयुक्त माहुल संजयकुमार इंदाणी, सहायक राज्यकर आयुक्त रामलाल सोगालाल पाटील यांच्यासह राज्य कर निरीक्षक प्रशांत शिवाजी रौंदळ, संदीप मखमल पाटील, योगेश सुभाषराव कानडे,(केसीएन)स्वप्नील लोटन पाटील, दीपक गोकुळ पाटील, सिद्धार्थ शंकर मोरे, संध्या नंदकिशोर वाकडे, श्वेता अरुण बागुल व कर सहायक परमेश्वर विश्वासराव इंगळे यांच्या पथकाने केली. Gst विभागाच्या च्या वतीने ॲड. कुणाल बी पवार यांनी काम पाहिले