जळगाव ( प्रतिनिधी ) – नशिराबाद येथील शेतकऱ्याच्या खळ्यातील गोठ्यात बांधलेल्या ६५ हजार रूपये किंमतीच्या दोन म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या अज्ञात चोरट्यांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद येथे रहिवाशी सुरेश लिलाधर झोपे (वय-६३) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते सेवानिवृत्त असून गुरांसह शेतीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. १३ जानेवारीरोजी रात्री त्यांनी त्यांच्या दोन म्हशी गावाच्या बाहेर खळ्यात बांधल्या होत्या. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ६५ हजार रूपये किंमतीच्या दोन म्हशी चोरून नेल्याचा प्रकार १४ जानेवारीरोजी सकाळी उघडकीला आला. सुरेश झोपे यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन करीत आहेत.