जळगाव (प्रतिनिधी) – गोलाणी मार्केट परिसरातील दत्त मंदिराजवळून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, म्हाडा कॉलनी येथील रहिवासी योगेश कन्हैय्यालाल यादव यांचे गोलाणी मार्केटमध्ये टीव्ही दुरूस्तीचे दुकान आहे. सकाळी दहा वाजता दुकानात आल्यानंतर ते सायंकाळी सात वाजता दुकान बंद करून घरी जातात. ७ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता ते नेहमीप्रमाणे दुकानावर आले. दुपारी घरी जेवायला गेल्यानंतर पुन्हा दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच.१९.एजी.४८५३) दुकानाकडे आले. त्यावेळी त्यांनी दुचाकी गोलाणी मार्केट परिसरातील दत्त मंदिराजवळ उभी केली होती. काही वेळानंतर लघुशंकेसाठी दुकानाबाहेर आले असता, त्यांना दुचाकी दिसून आली नाही. परिसरात शोध घेवून सुध्दा ती मिळून न आल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले. योगेश यादव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.