पाचोरा (प्रतिनिधी) : तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित गो.से. हायस्कूल पाचोरा येथे सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता १४ वर्षाखालील व १९ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी तालुका बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष सुरज वाघ, गो. से. हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. आर. पाटील, तालुका क्रीडा समन्वय प्रा.गिरीश पाटील, उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, पर्यवेक्षक ए.बी. अहिरे , पर्यवेक्षिका अंजली गोहिल, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी.तडवी, पंच अभिषेक जाधव, गो. से. हायस्कूल व तालुक्यातील क्रीडा शिक्षक संजय करंदे, संजय दत्तू , एस. बी. मनोरे, शितल साळुंखे यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरज वाघ यांच्या हस्ते सोंगटी हलवून बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मुख्याध्यापक एन.आर. पाटील यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना बुद्धिबळ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व स्पर्धेचे नियम अटी समजावून सांगितल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. बोरसे व आभार प्रदर्शन एम.जे. चिंचोले यांनी केले.