जळगाव- गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव येथील १६ विद्यार्थ्यांची पुणे येथील किरण अकॅडमी (घळअॅरप अलरवशू), पुणे येथे इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासाला चालना मिळणार आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये संगणक शास्त्र अभियांत्रिकी विभागातील ६, आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागातील ६ आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील ४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.या विद्यार्थ्यांना जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट आणि पायथॉन फुल स्टॅक डेव्हलपमेंट या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण व व्यावहारिक अनुभव मिळणार आहे.
या इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार कौशल्ये विकसित करण्याची तसेच भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी स्वतःला तयार करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि रोजगारक्षमता वाढविण्यासाठी विविध प्रशिक्षण व प्लेसमेंट उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांचा सकारात्मक परिणाम म्हणून विद्यार्थ्यांना नामांकित संस्थांमध्ये इंटर्नशिपच्या संधी मिळत आहेत.या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. विजयकुमार वानखेडे, तसेच डॉ. अनिल विश्वकर्मा, डॉ. हेमंत इंगळे आणि डॉ. निलेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या निवड प्रक्रियेसाठी प्लेसमेंट विभाग समन्वयक प्रा. रेश्मा अत्तरदे, प्रा. वेलचंद होले आणि प्रा. हेमराज धांडे यांनी सहकार्य केले.संस्थेच्या पदाधिकार्यांनी, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आणि प्राध्यापकवृंदाने निवड झालेल्या सर्व १६ विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.सदर यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील(सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील(डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.









