नियोजन समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
जळगाव – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेन्टीव्ह अॅण्ड सोशल मेडीसीन आणि इंडियन पब्लीक हेल्थ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १६ ते १८ जानेवारी या कालावधीत आरोग्याचा अधिकार: विस्तारणारे क्षेत्र या विषयावर जनऔषध वैद्यकशास्त्र विभागामार्फत २६ वी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान यासंदर्भात माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक पार पडली. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दि. १६ ते १८ जानेवारी या कालावधीत होणार्या या २६ व्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजक अध्यक्ष म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके हे आहेत. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. केतकी पाटील सभागृहात यासंदर्भात नियोजन समितीची बैठक माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. या बैठकीत अर्थ समिती, नोंदणी समिती, डीजीटल समिती, वैज्ञानिक समिती, वाहतूक समिती, हॉटेल समिती, भोजन समिती गठीत करण्यात आल्या आहेत. या बैठकीला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. चंद्रय्या कांते, डॉ. माया आर्विकर, डॉ. दिलीप ढेकळे, डॉ. नीलेश बेंडाळे, डॉ. धनंजय बोरोले, डॉ. देवेंद्र चौधरी, डॉ. रंजना शिंगणे, डॉ. प्रशांत गुडेट्टी, डॉ. रणधीर पांडे, डॉ. आलोक कुमार, डॉ. संतोषकुमार, डॉ. मनीष तिवारी, डॉ. विजय मोरे, डॉ. भवानी वर्मा, अब्दुल्लाह, प्रा. बापूराव बिटे, डॉ. प्रज्ञा, डॉ. प्रकाश तिरूआ, डॉ. रसिका आदींसह कर्मचारी वृंद उपस्थित होते.