विद्यार्थ्यांच्या ‘आशा-सुमन स्वर सुमनांजली’ने जळगावकर रसिक मंत्रमुग्ध

सुरेल आणि मनोहारी सादरीकरण
पावसाच्या आगमनाचे स्वागत करत विद्यार्थ्यांनी गायन व नृत्याच्या विविध कलाप्रकारांचे मनोहारी सादरीकरण केले. कार्यक्रमाची सुरुवात ‘ओंकार प्रधान’ या गणेशवंदनेने झाली. त्यानंतर ‘नाविका रे’, ‘ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर’, ‘केतकीच्या वनी तिथे’, ‘केशवा माधवा’, ‘दो लब्जों की है’, ‘धुंदी कळ्यांनो’, ‘सारे के सारे गा मा को’, ‘चंदा राणी’, ‘जाइए आप कहाँ जायेंगे’, ‘अभी ना जाओ छोड़कर’ आणि ‘ओ मेरे सोना रे’ यांसारखी एकापेक्षा एक लोकप्रिय गीते सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय, ‘पिया बावरी’ आणि ‘कोई शहरी बाबू’ या गाण्यांवर सादर झालेल्या कथक नृत्याच्या आकर्षक प्रस्तुतीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, संचालिका डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकीताई पाटील आणि प्राचार्या सौ. पद्मजा नेवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सहभागी कलाकार व साथसंगत
कार्यक्रमात समीक्षा माकोडे, वेदिका झारे, मंजिरी जोशी, राजश्री पाठक, अलका खैरनार, किरण सानी, नाजनीन शेख, हितेशी प्रजापती, ऐश्वर्या काळकर, नंदा दैवज्ञ, राधिका दैवज्ञ, रिया वर्मा, समृद्धी जोशी, लावण्या दहाड, कनकश्री अय्यंगार, निशिता चौधरी, निकिता जोशी, प्रणव ईखे, पूजा नारखेडे, दिशा महाजन, काव्या बोबडे, आरुषी अदमाने, रिया दहाड, स्वरा थोरात, अथर्व पाटील, डेलिना अतरदे, धनश्री जोशी, वीरा चौधरी, वैदेही राजपूत, आरोही सूर्यवंशी आदी बाल व युवा कलाकारांनी आपल्या कलेचे प्रभावी सादरीकरण केले.
या कलाकारांना सिंथेसायझरवर श्री. सुशील महाजन, ऑक्टोपॅडवर प्रा. देवेंद्र गुरव आणि तबल्यावर श्री. प्रवीण महाजन यांनी सुरेल साथसंगत केली.
उत्कृष्ट संयोजन व परिश्रम
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संध्या फासे यांनी केले, तर प्रास्ताविक,Aabhar डॉ. महिमा मिश्रा यांनीकेले. महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. पद्मजा नेवे आणि डॉ. महिमा मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र व्यवस्थापक राजू पाटील, श्री. भूषण खैरनार अनंता साठे, किशोर चौधरी आणि ईश्वर पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमात आशा भोसले व सुमन कल्याणपूर यांच्या गीतांचा सुरेल आविष्कार अनुभवायला मिळाल्याने उपस्थित रसिकांनी कलाकारांचे भरभरून कौतुक केले.







